Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
लाजवाब: मनोगत व विषयप्रवेश
लाजवाब: मनोगत व विषयप्रवेश

लाजवाब: मनोगत व विषयप्रवेश

00:36:03
Report
श्री रवी दाते यांजसारख्या एखाद्या अवलिया व्यक्तिमत्वाचे एवढे कोड कौतुक होते तेव्हा अश्या व्यक्तीच्या मागे अनेकजण अर्थातच खंबीरपणे उभे असतात हे ओघाने आलेच आणि त्यात श्रीमती ज्योती दाते ह्या अर्धांगिनीने घेतलेले कष्ट ह्याला मोलच नाही. फार काळजीपूर्वक, मानाने कुठेही कोणी दुखावले जाणार नाही ह्या बेताने त्यांनी श्री रवी दात्यांबरोबर केलेला त्यांचा जीवनप्रवास फार सुंदर मांडला आहे. स्वतःची लेखिका, पत्रकार ही छबी नवऱ्याच्या कलेकलेने सर्व काही करून जपणे आणि ह्यामध्ये श्रीमती ज्योती ताईंची झालेली घालमेल हे सर्वकाही लेखनात खुबीने कथन केले आहे.'लाजवाब' पुस्तकातील श्री रवी दाते ह्यांच्या व्यक्तिचित्रणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार कायम स्वतःला कसे बदलले आणि हे करताना जीवनाचा पुरेपूर आनंद स्टाईलमध्ये घेण्यात कुठेही कसर सोडली नाही. अनेक नवोदित अलिकडल्या गायकांना वेगळ्या पद्धतीने गुरू म्हणून शिक्षण देऊनही 'गुरू शिष्य' परंपरेतही श्री रवी दाते ह्यांनी नवीन बदल अवलंबला. 'लाजवाब' अफलातून जीवनप्रवास, हे श्री रवी दाते ह्यांच्या वरील श्रीमती ज्योती दाते ह्यांनी लीहिलेले पुस्तक खुद्द ज्योती दाते त्यांच्या 'मैफल पॉडकास्ट'  माध्यमातून श्रोत्यांसाठी आज २८/२/२०२४ पासून महिन्यातून दोनदा,  दर बुधवारी सादर करणार आहेत.जरूर वेळ काढून मैफल पॉडकास्ट ऐका आणि  अभिप्रायही जरूर कळवा.#ashaagniसदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे datemaifal@gmail.com  ह्या इमेलवर जरूर कळवावे. धन्यवाद. संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन: आशा आणी मिलिंद अग्निहोत्रीपॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते(C) ज्योती दाते, २०२२-२०२४

लाजवाब: मनोगत व विषयप्रवेश

View more comments
View All Notifications